Nawab Malik Health Serious
Nawab Malik Health Serious  Saam Tv
मुंबई/पुणे

जेलमध्ये नवाब मलिकांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवाब मलिक यांना मुंबईतील (Mumbai) जेजे रुग्णालयात (hospital) अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले. काल सकाळी रक्तदाब कमी झाल्याने आणि पोटाच्या काही समस्येमुळे नवाब मलिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Nawab Malik Health Serious)

हे देखील पाहा-

तसेच, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जेजे रुग्णालय प्रशासनाने माहिती दिली आहे. तर, सध्या नवाब मलिक आयसीयूमध्ये (ICU) दाखल असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी मुंबईतील विशेष न्यायालयाला दिली आहे. परंतु, नवाब मलिकांच्या जामीन याचिकेवर विरोध केला जात आहे. कोर्टाने मलिकांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली आहे. मलिक यांना जेलमधून स्ट्रेचरवरुन जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवाब मलिकांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिकांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. तसेच त्यांना आज स्ट्रेचरवरुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आर्थर रोड जेलमधून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ईडीने कोर्टामध्ये प्रश्न केला आहे की, महाराष्ट्राचे मंत्री आजारी होते तर आम्हाला कळवण्यात का आले नाही? यामुळे पुढील सुनावणी घ्यावी. परंतु, कोर्टाने आरोपीची तब्येत महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: 'या' टीप्स फॉलो केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Today's Marathi News Live : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 'वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट' अभियान

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Crime News: शिवी दिल्याच्या रागातून भयंकर कांड.. चौघांनी मिळून जिवलग मित्राला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

SCROLL FOR NEXT