Navi Mumbai विकास मिरगणे
मुंबई/पुणे

Navi Mumbai पोलिसांची गुटखा विरोधात मोठी कारवाई, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त

नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) 42 लाख 72 हजार किंमतीचा विमल कंपनीचा गुटखा आणि या गुटख्याची वाहतूक करण्यासाठी असलेले 4 टेम्पो असा एकूण 60 लाख 72 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विकास मिरगणे

नवी मुंबई- नशा मुक्त नवी मुंबई या अभियानाअंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठं यश प्राप्त झालं आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचत नवी मुंबई (Navi Mumbai) पोलिसांनी 4 टेम्पो आणि एका गोदामावर धाड टाकली असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात विमल कंपनीच्या गुटख्याच्या साठा हाती लागला आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाला देखील पाचारण करण्यात आले. नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) 42 लाख 72 हजार किंमतीचा विमल कंपनीचा गुटखा आणि या गुटख्याची वाहतूक करण्यासाठी असलेले 4 टेम्पो असा एकूण 60 लाख 72 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Navi Mumbai Latest News)

हे देखील पहा -

या अवैध गुटखा विक्री प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी परराज्यातून छुप्या मार्गाने कमी दरात गुटखा खरेदी करून नवी मुंबईतील एमआयडीसी विभागातील भाड्याच्या गोदामामध्ये साठवत असे आणि नंतर छोट्या टेम्पोमधून मुंबई, नवी मुंबई व ठाणे मध्ये व्यावसायिकांना ज्यादा दराने विक्री करत होते. या प्रकरणाचा अधिक तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT