Navi Mumbai Crime Saam TV
मुंबई/पुणे

Panvel Crime News : अशी लेक नकोच! मुलीनेच १० लाखांत दिली आईच्या हत्येची सुपारी; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Navi Mumbai Crime : मुलीनेच आपल्या जन्मदात्या आईची १० लाखांत सुपारी दिल्याची खळबळजनक घटना पनवेल शहरात घडली.

Satish Daud

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

बाहेर फिरण्यास आणि मोबाइल वापरण्यास निर्बंध टाकल्याने लाडक्या लेकीनेच जन्मदात्या आईच्या हत्येची सुपारी दिली. ही खळबळजनक घटना पनवेल शहरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मुलीसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. प्रिया नाईक असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.

तर प्रणिता नाईक, विवेक पाटील आणि निशांत पांडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रिया नाईक यांची मुलगी प्रणिता विवाहित आहे. पतीसोबत पटत नसल्याने मागील २ वर्षांपासून ती आईकडेच राहत होती. यावेळी बाहेर फिरण्यावर आणि मोबाईल वापरावर प्रिया यांनी प्रणितावर निर्बंध आणले होते.

यातून सुटका मिळवण्यासाठी प्रणिताने आपल्या आईची हत्या करण्याचा कट रचला. तिने मानलेला भाऊ विवेक पाटील याला १० लाख रुपयांची सुपारी दिली. आरोपी विवेकने आपला मित्र निशांतच्या मदतीने प्रिया यांची गळा आवळून हत्या (Crime) केली. आपल्या आईची कुणीतरी हत्या केली असा बनाव आरोपी प्रणिताने पोलिसांसमोर रचला होता.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, तपासात पोलिसांना वेगळाच संशय आला. मृत प्रिया यांचे प्रणितासोबत पटत नसल्याचे पोलिसांना लक्षात आले. त्यांनी प्रणिताला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे दिले.

मात्र, पोलिसांनी खाकीचा इंगा दाखवताच प्रणिता पोपटासारखी बोलू लागली. आपणच मानलेल्या भावाला आईच्या हत्येची सुपारी दिल्याची कबुली तिने दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रणितासह विवेक पाटील आणि निशांत पांडे या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीनेच जन्मदात्या आईचा काटा काढल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT