Navi Mumbai Kharghar Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai News : नवी मुंबईतील खारघरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा; सिनेस्टाईल थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Navi Mumbai Kharghar News : दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्समधील लाखो रुपयांचे दागिने लंपास केले.

Satish Daud

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

नवी मुंबईतील खारघर परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास एका ज्वेलर्स दुकानावर दरोडा पडला. दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्समधील लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. दरोड्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दागिन्यांची चोरी केल्यानंतर हवेत गोळीबार करून चोरटे पसार झाले.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील (Navi Mumbai News) खारघर परिसरात एक ज्वेलर्सचे दुकान आहे.

रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास या दुकानात तीन दरोडेखोर घुसले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील लाखो रुपयांचे सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. यावेळी दुकानाच्या बाहेर असलेल्या लोकांनी दरोडेखोरांना (Kharghar Crime News( रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींच्या हातात बंदुक असल्याने कुणालाही काहीही करता आलं नाही.

ज्वेलर्सच्या दुकानाची लूट केल्यानंतर दरोडेखोर बाहेर आले. त्यावेळी नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत दुचाकीवरून धूम ठोकली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT