Uran Car Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Uran Accident : उरणमध्ये हिट अँड रनचा थरार, भरधाव कारने 5 दुचाकींना उडवलं; तिघे गंभीर जखमी

Uran Car Accident News : उरणमधील द्रोणागिरी नोड येथील देवकृपा चौकात शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Satish Daud

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 5 दुचाकींना जोरदार धडक दिली. यानंतर कार एका पानटपरीला जाऊन धडकली. या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपघाताचा थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. उरणमधील (Uran News) द्रोणागिरी नोड येथील देवकृपा चौकात शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवकृपा चौकात एक पानटपरी असून येथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पानटपरीवर काही लोक आले होते. त्यांनी रस्त्याच्या कडेला आपल्या दुचाक्या उभ्या केलेल्या होत्या.

त्याचवेळी अचानक भरधाव कार आली. काही क्षणातच या कारने दुचाकींना जोरदार धडक दिली. कारचा वेग इतका जास्त होता, की दुचाकींना धडक (Accident) दिल्यानंतर कार थेट पानटपरीच्या भिंताला जाऊन आदळली. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर परिसरात मोठी आरडाओरड झाली. नागरिक येत असल्याचं बघताच कारचालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना स्थानिकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कैद झाला असून पोलीस कारचालकाचा शोध गेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT