महानगरपालिका शाळांमधील दुकानदारी उघड; मुख्याध्यापकाकडून पैशांची मागणी विकास मिरगणे
मुंबई/पुणे

महानगरपालिका शाळांमधील दुकानदारी उघड; मुख्याध्यापकाकडून पैशांची मागणी

.. तरच शाळा सोडल्याचा दाखला मिळेल, असा थेट आदेशच नवी मुंबई पालिकेच्या माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकाने दिल्याने एका विद्यार्थ्याला मोठा धक्का बसला.

विकास मिरगणे

नवी मुंबई : दहावी SSC उत्तीर्ण होऊन शाळेचा दाखला काढण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याला student तुर्भे शाळा क्रमांक १०७ चे मुख्याध्यापक Headmaster दीपक बडगुजर यांनी पैसे भरूनच दाखला मिळवण्याची अट घातली आहे. यासंदर्भात विद्यार्थी आणि पालकांसमोर parents मुद्दा मांडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हे देखील पहा-

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न झाल्याने, अंतर्गत मूल्यांकन करून गुण देण्यात आले आहेत. यात ९ वी इयत्तेचे गुण आणि दहावीच्या वर्षभरातील गुण देण्यात शाळेची महत्त्वाची भूमिका होती. याचा गैरफायदा घेऊन ,तुर्भे शाळा क्रमांक १०७ चे शिक्षक शंकर कुसराम यांनी मुकुंद बागडे या दहावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची आई जयश्री बागडे हिच्याकडे तब्बल ५ हजारांची मागणी केली होती.

परंतु, परिस्थितीमुळे तेवढ रक्कम देऊ शकलो नाही. याबाबत कुसराम यांनी बागडे यांनी लावलेले आरोप फेटाळले आहेत. अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तके कोणती लागतील. एवढेच सांगितल्याचे स्पष्ट केले आहे, तर मुख्याध्यापक दीपक बडगुजर यांनी जयश्री यांच्याकडे पैसे मागितल्याची कबुली दिली आहे.

बागडे यांचा मुलगा मुकुंद हा मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला होता. यामुळे त्याने यंदा १७ क्रमांकाचा अर्ज भरून बाहेरून परीक्षा दिली होती. दहावीच्या एसएससी बोर्डाचा अर्ज भरण्यासाठी त्याने पालिकेच्या तुर्भेतील शाळा क्रमांक- १०७ च्या केंद्रातून अर्ज भरला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या गणवेशात होणार मोठा बदल; रेल्वे मंत्री काय म्हणाले? वाचा

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT