Congress 
मुंबई/पुणे

काँग्रेस 'एकला चलो रे' भूमिकेत; 'महाविकास' ची बिघाडीची शक्यता

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाचे आम्ही अंमलबजावणी करणार असे काॅंग्रेसचे कार्यकर्ते सांगताहेत.

विकास मिरगणे

नवी मुंबई : येथील महापालिका निवडणुकीची (election) तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत. मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस (congress) स्वबळावर भूमिकेत असताना आता नवी मुंबई महापालिकका निवडणुकीतही एक चलो रे या भूमिकेत काँग्रेस आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाचे आम्ही अंमलबजावणी करणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी तसेच जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर दहा नगरसेवक निवडून आले होते. त्यातले चार नगरसेवक गणेश नाईक यांच्याकडे गेले. त्यामुळे काँग्रेसकडे फक्त सहा नगरसेवक राहिले असून तरी काँग्रेस स्वबळावर लढवण्याची तयारी करताना दिसून येत आहे. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी असून सुद्धा स्वबळावर लढण्याची तयारी असावी असे काँग्रेसला वाटत आहे. काँग्रेस शिवसेनेवर दबाव टाकून अधिकाधिक जागा कशा मिळतील याची रणनीती काँग्रेसने आतापासून आखली असून त्यामुळे स्वबळावर लढणार असा संदेश देण्याकरता काँग्रेसची भूमिका दिसून येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्यामुळे शिवसेनेची ताकद नवी मुंबई शहरामध्ये अधिक असल्यामुळे त्यामुळे शिवसेना आपल्यामित्र पक्षाला अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीला जास्त जागा देणार नसल्याची भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी आतापासूनच घेतल्याची दिसून येत आहे. काँग्रेस स्वबळावर भूमिका घेत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. जो काँग्रेस निर्णय घेईल तो महाविकास आघाडीला मान्य असेल आणि त्यांना त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे असे सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी नमूद केले.

राज्यात महाविकास आघाडी असली तरी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आता पासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाड झाल्यास अर्थात भाजपला गणेश नाईकांना फायदा होईल. ही निवडणुक प्रभाग पद्धतीने होणार असून त्यामुळे अपक्षांची डाळ शिजणार नाही असंही वाटत आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT