Ketaki Chitale Latest Update News SAAM TV
मुंबई/पुणे

Ketaki Chitale Latest Update: अभिनेत्री केतकी चितळेवर शाईफेक करणाऱ्यांवर गुन्हा

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी सध्या पोलीस कोठडीत असलेली अभिनेत्री केतकी चितळेवर शाईफेक करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कळंबोली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर केतकीला ठाण्याकडे घेऊन जात होते. त्याचवेळी पोलीस ठाण्याच्या बाहेरच तिच्यावर शाईफेक करण्यात आली होती. (Ketaki Chitale News Update)

अभिनेत्री केतकी चितळेवर राज्यभरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या ती पोलीस कोठडीत आहे. केतकीला कळंबोली पोलीस (Police) ठाण्यातून ठाण्याला नेण्यात येत होते. त्यावेळी ती पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच, तिच्यावर काही कार्यकर्त्यांनी शाई आणि अंडी फेकली होती. केतकीवर शाई आणि अंडीफेक करणाऱ्यांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम १८६ अन्वये एकूण चार जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नवी मुंबईत केतकी चितळेवर दुसरा गुन्हा दाखल

दरम्यान, शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणात राज्यभरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. आता नवी मुंबईत आणखी एक गुन्हा नोंदवला आहे. हा नवी मुंबईतील दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या केतकीच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. नेरूळनंतर कळंबोली पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता नवी मुंबई पोलीस केतकीला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या किरण इनामदारवरही पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर केतकी चितळेनं आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तिचा निषेध केला होता. नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली होती. या प्रकरणी राज्यभरात तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीला अटक केल्यानंतर कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली होती. सध्या ती पोलीस कोठडीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT