Delhi Dwarka Accident  Saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Accident : नवी मुंबईत भल्या पहाटे हिट ॲण्ड रनचा थरार, भयंकर अपघातात महिलेचा जागीच मृत्यू

Hit and run Navi Mumbai, Ulwe-Belapur highway : नवी मुंबईतील उलवे-बेलापूर महामार्गावर पहाटे कंटेनरने ऑटोला जोरदार धडक दिली. या भीषण हिट अँड रन अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

Namdeo Kumbhar

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

Navi Mumbai hit-and-run accident on Ulwe-Belapur highway : नवी मुंबईमध्ये आज पहाटे पाच वाजता हिट ॲण्ड रनची धक्कादायक घटना घडली आहे. उलवे-बेलापूर महामार्गावर कंटेनरने ऑटोला जोरात धडक दिली, त्यानंतर तो फरार झाला. या भीषण अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर ऑटो चालक थोडक्यात बचावला. मात्र, त्याला गंभीर दुखापत झाली असून रूग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून या अपघाताची नोंद केली असून चालकाचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून आजूबाजूच्या सीसीटीव्हीच्या आधारावर शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

गेल्या काही दिवसांपासून उलवे-बेलापूर महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे पाच वाजता एका कंटेनरने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षामधील महिलेचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षाचालक थोडक्यात बचावला आहे. पण त्याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भयंकर अपघातानंतर कंटेनर चालक वाहन सोडून फरार झाला आहे. या प्रकरणी उलवे पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून ऑटो चालकाचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. जखमीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवला आहे. पोलिसांकडून मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम करण्यात येत आहे. पोलिसांनी चालकाचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बेलापूर-उलवे महामार्ग हा अपघातप्रवण ठरत असून गेल्या एका वर्षात या मार्गावर तब्बल १५ ते २० जणांनी प्राण गमावले आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार रस्ता सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. पण प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder eKYC: फक्त २ मिनिटांत करा एलपीजी गॅस सिलिंडरची ईकेवायसी ; स्टेप बाय स्टेप करा फॉलो; अन्यथा मिळणार नाही सब्सिडी

स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकच्या डॉ. अमोल पाटलांबद्दल धक्कादायक माहिती समोर, ९६ महिलांचे...

Social Media Use: सोशल मीडियावर तासनतास घालवल्याने डिप्रेशनचा धोका वाढतो का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

SCROLL FOR NEXT