Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : नवऱ्याला सोडून वॉचमनशी प्रेम, महिलेसोबत घडलं भयंकर

महिलेच्या हत्येचे गूढ उकलण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्देश

Mumbai Latest Crime News : कोपरखैरणेतील खाडी किनाऱ्यालगतच्या झुडपामध्ये रविवारी सायंकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. अखेर या महिलेच्या हत्येचे गूढ उकलण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे.

अज्ञात व्यक्तीने ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली होती. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह खाडीमध्ये ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या संदर्भात कोपरखैरणे पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोपरखैरणे (Kopar Khairane) पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आलं. नवी मुंबई पोलिसांनी ४८ तासांच्या आत आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेची हत्या तिच्यासोबत प्रेमसंबंध असलेल्या सुरक्षारक्षकानेच केल्याचे तपासात निषन्न झालेय. राजकुमार पाल असे या सुरक्षारक्षकाचे नाव असून मृत महिलेने राजकुमारच्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केल्याचे उघडकीस आलं आहे.

मृत महिला मानखुर्द येथे राहणारी असून तिचे लग्न झाले आहे. सदर महिला ही जुईनगर येथे एका सोसायटी मद्ये कामाला येत होती तेथे काम करणाऱ्या राजकुमार पाल याच्याबरोबर तिचे प्रेम सबंध होते. ती सतत त्याला लग्नाचा तगादा लावत असल्याने त्याने तिची हत्या करून मृतदेह खाडीकिनारी टाकल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली आंदोलनादरम्यान मोठी घडामोड! रुग्णालयात सोनम वांगचुक यांची 2 केंद्रीय मंत्र्यांसोबत 45 मिनिटे चर्चा; बैठकीत काय घडलं?

Maharashtra News Live Update: दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

आमचा वेळ वाया घालवू नका; विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार? कृषिमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देत सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT