Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News : नवी मुंबईच्या नेरुळमध्ये गुंडाची हत्या, गवळी गँग आणि शरद मोहोळशी होते संबंध

navi Mumbai Crime News in Marathi : आता नवी मुंबईच्या नेरुळमध्ये एका गुंडाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

विनय म्हात्रे, नवी मुंबई

Navi Mumbai Crime News:

राज्यात हत्येचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वी गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. तर काही दिवसांपूर्वी बोरिवलीत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली. या घटनेनंतर आता नवी मुंबईच्या नेरुळमध्ये एका गुंडाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत गुंड चिराग लोकेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. लोकेची नेरुळ जवळील त्याच्या घराजवळ झाली आहे. लोखंडी रॉडने चिराग लोके आणि त्याच्या पत्नीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चिराग जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी जखमी आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चिरागचे गवळी गँग आणि पुण्यातील शरद मोहोळशी संबंध होते. चिरागला नवी मुंबई पोलिसांनी मोक्का अंतर्गत अटकही केली होती.

ठाण्यातील मनसेचे शाखाध्यक्ष जमील शेख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधाराला अटक

राबोडीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या हत्या प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने संशयित सूत्रधार चौथा आरोपी ओसामा शेख (३५, रा. उत्तरप्रदेश, ठाणे) याला अटक केली आहे.

ओसामाला उत्तरप्रदेशच्या विशेष तपास पथकाच्या (एसटीएफ) मदतीने अटक केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. याच प्रकरणात याआधी तिघांना अटक केली आहे. तब्बल तीन वर्षांनी या सूत्रधाराला पकडण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

SCROLL FOR NEXT