सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही
नवी मुंबईतील उरण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उरण-पनवेल मार्गावर एका २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. यशश्री शिंदे असं मृत तरुणीचं नाव असून तिच्या छातीवर आणि अंगावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी (Police) यशश्री हिचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी उरण येथील सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री शिंदे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
शनिवारी सकाळच्या सुमारास उरण-पनवेल (Uran Panvel Highway) मार्गावरील रस्त्यालगत यशश्रीचा मृतदेह आढळून आला. प्रेमसंबंधातून तिची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. हत्या करणाऱ्या आरोपीने यशश्रीच्या छातीवर आणि अंगावर चाकूने वार केल्याचं समजतंय.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, आमच्या मुलीची हत्या करणारा आरोपी हा एका विशिष्ट समाजातील असल्याचा आरोप यशश्रीच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही देखील त्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.