Navi Mumbai Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

धावत्या AC बसमध्ये कपलचे शरीरसंबंध, बस कंडक्टर गोत्यात, २२ सेकंदाचा VIDEO व्हायरल; नवी मुंबईत धक्कादायक प्रकार | Navi Mumbai

Navi Mumbai Couples romance on running AC bus: नवी मुंबई महानगरपालिकेच्या एसी बसमध्ये एका जोडप्याने सार्वजनिक ठिकाणी शरीरसंबंध ठेवलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Bhagyashree Kamble

एका विचित्र घटनेमुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. एक जोडपं चक्क बसमध्ये सेक्स करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ही बस नवी मुंबई महानगरपालिका परिवहनची असून, ती वातानुकूलित होती. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये कपल व्यतीरिक्त कुणीही नव्हते. याच गोष्टीचा फायदा घेत त्यांनी शरीरसंबंध ठेवले. बसच्या बाजूने जाणाऱ्या कारमधील एका व्यक्तीने पाहिले आणि त्याने व्हिडिओ शूट करत शेअर केला. २२ सेकंदाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

कारवाई सुरू

एनएमएमटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी बस कंडक्टरविरोधात कारवाई सुरू केलीय. कंडक्टरने कपलकडून सुरू असलेले कृत्य थांबवण्यासाठी प्रयत्न केले नाही, या कारणामुळे त्याच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. कंडक्टर हा बसच्या पुढच्या सीटवर बसला होता. त्याला बसच्या मागे काय घडत आहे, याची कल्पना नव्हती. त्याने लक्ष ठेवणं गरजेचं होतं, असं त्यांनी सांगितलं.

बस पनवेलहून कल्याणला जात होती

महाराष्ट्रातील आरटीआय कार्यकर्ते अनारजीत चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस पनवेलहून कल्याणला जात होती. त्यात जास्त गर्दी नव्हती. वाहतूक असल्यामुळे रस्त्यावरून बस हळू जात होती. दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने त्या जोडप्याला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. तसेच कपलचा व्हिडिओ शूट करून शेअर केला. त्यानंतर हा २२ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'आजच्या तरूणांनी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या वर्तनाबद्दल अधिक काळजी घ्यायला हवी. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर कृती करणे टाळावे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT