Panvel Private Bus-Tracker Accident Saam TV
मुंबई/पुणे

Panvel Bus Accident : पंढरपूरला निघालेल्या भाविकांवर काळाची झडप; खासगी बस दरीत कोसळली, ५ जणांचा जागीच मृत्यू

Panvel Private Bus-Tracker Accident : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने झडप घातली. मुंबईहून पु्ण्याकडे निघालेल्या खासगी बसचा पनवेलजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला.

Satish Daud

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही नवी मुंबई

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने झडप घातली. मुंबईहून पु्ण्याकडे निघालेल्या खासगी बसचा पनवेलजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. बससमोर अचानक ट्रॅक्टर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Mumbai Pune-Expressway Panvel Taluka Bus-Tracker Accident News)

तर ४२ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

यापैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय. अपघातातील मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही. मात्र, बसमधील (Panvel Bus Accident News) प्रवासी डोंबिवली येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जातंय. नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त खासगी बसला बाहेर काढले.

मदत कार्य पूर्ण झाल्यावर पुण्याकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली येथील ५४ प्रवाशांना घेऊन एक खासगी बस मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. सोमवारी रात्री बस पनवेल हद्दीत आली असता, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अचानक बससमोर एक ट्रॅक्टर आला.

त्यामुळे बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत ५ प्रवासी जागीच ठार झाले. तर ४२ प्रवासी जखमी झाले. मृत्तांमध्ये बसमधील तिघे आणि ट्रॅक्टर वरील दोघांचा समावेश आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT