PM Modi visit to Pune: मेट्रो प्रवासादरम्यान राष्ट्रवादी युवती काँग्रेसने दाखवले काळे झेंडे; (पहा Video) SaamTv
मुंबई/पुणे

पंतप्रधान मोदींच्या मेट्रो प्रवासादरम्यान राष्ट्रवादी युवती काँग्रेसने दाखवले काळे झेंडे; (पहा Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज पुणे (Pune) मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या टप्प्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्याच बरोबर नदीसुधार प्रकल्पाचीही सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे. पुणे मेट्रोच्या अर्धवट कामाचे उद्घाटन करत पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचा आरोप करत, पंतप्रधान मोदींचे बिल्डिंगच्या टेरेसवर येऊन काळे झेंडे दाखवत निषेध केला. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते यांच्यासह कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. (Nationalist Yuvati Congress displayed black flags during Prime Minister Modi Metro journey)

पहा व्हिडिओ-

दरम्यान मोदींच्या दौऱ्या आधीच पुण्यातलं राजकारण तापलंय. अर्धवट प्रकल्पाचं उद्घाटन मोदी करत असल्याची टिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. दरम्यान मोदींच्या दौऱ्या आधीच पुण्यातलं राजकारण तापलं आहे. अर्धवट प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करत असल्याची टिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तर आज मोदींचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आंदोलन करुन काळे झेंडे दाखवण्यात आले आहे.

सत्ताधारी भाजपकडून (BJP) आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादींकडून (Shivsena) मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी पुणेकरांनी शहरभर खोचक टोमणे मारणारे बॅनर लावले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत. त्यानंतर मोदी आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन करुन सिम्बॅायसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

Vidhan Bhavan Threat Mail: मुंबईत ४ ठिकाणी बॉम्बने उडवण्याची धमकी; पाहा ईमेलमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT