Nashik Weather Update Saam Tv
मुंबई/पुणे

Nashik Weather Update: फेब्रुवारीतच मे महिन्याची फिलिंग, नाशिकचा पारा 35 अंशावर

नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे.

वृत्तसंस्था

तबरेज शेख

Nashik Weather Update: नाशिक: गेल्या दोन महिन्यांपासून थंडीचा कडाका सहन करणाऱ्या नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये 35.5 अंश सेल्सिअंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर किमान तापमान 13.6 अंश इतके नोंदविले गेले (Nashik Summer Stars Temperature Increases To 35 Celsius). 

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमान (Weather Update) वाढायला सुरुवात होते. मात्र, यंदा फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिककर बाहेर पडतांना चष्मा, टोपी, स्कार्फचा आधार घेत आहेत. तर, गर्मीपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक थंड पेयच्या दुकानात गर्दी करतांना दिसत आहेत.

नाशिकमध्ये उन्हामुळे रस्त्यांवर देखील शुकशुकाट दिसत आहे. हळूहळू कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत असून, येत्या काही दिवसांत तापमान चाळिशी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एव्हाना एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाच्या तप्त झळांनी हैराण व्हायला होते. मात्र, सध्या फेब्रुवारीतच नागरिकांच्या शरीराची लाहीलाही व्हायला सुरुवात झाली आहे.

पुढील काही दिवस तापमानाचा हा वाढता पारा कायम राहणार असून गरम आणि कोरड्या वाऱ्यांमुळे तापमान वाढत जाणार आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT