Narayan Rane Vs Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाण्याची नारायण राणेंची तयारी; म्हणाले...

'जे बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत त्यांनी शिंदे गटात सहभागी व्हावं, कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची नाही.'

Jagdish Patil

मुंबई: उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मला दसरा मेळ्याव्याचं आमंत्रण दिलं तरी त्यांच्या मेळाव्याला जाईन पण ते मला आमंत्रण देणार नाहीत. शिवाय जे बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत त्यांनी शिंदे गटात सहभागी व्हावं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं आहे.

राज्यभरात शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीमुळे यावेळी शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. तर बंडखोर शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडणार आहे.

पाहा व्हिडीओ -

भाजप आणि शिंदे गटाकडून ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. खरी हिंदुत्वाच्या विचारांची शिवसेना ही शिंदेंची असून सर्व शिवसैनिकांनी शिंदेच्या मेळाव्याला जावं असं देखील भाजप आणि शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. अशातच आता राणे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंनी मला बोलावलं तर मी त्यांच्या दसरा मेळाव्याला जाईन पण मला ते आमंत्रण देणार नाहीत. शिवाय जे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे शिवसैनिक आहेत त्यांनी शिंदे गटात सहभागी व्हावं, कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची नाही.

अडीच वर्षे या राज्याला ज्याने मागे नेले त्यांचे नाव घ्यायचे नाही आणि जे पक्ष त्यांना पाठींबा देत आहेत त्यांची अवस्था सध्या काय आहे. मग ते काँग्रेस असो वा राष्ट्रवादी असा टोला राणे यांनी लगावला.

शिवाय अंधेरी निवडणुकीसाठी त्यांच्याकडे उमेदवार राहिलेले नाहीत, सर्व शिंदे गटात गेले आहेत आता भावानेचा विचार करून निवडणूक लढत आहेत. भावनेवर मतदान करणार नाही. विकासावर मतदान होईल भावनेवर होणार नाही. निवडणुकी आधी चिन्हाचा निर्णय होईल असे वाटते असंही राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT