संजय राऊत, तुमच्या धमक्यांना भाजप भीक घालत नाही- राणे Saam Tv
मुंबई/पुणे

संजय राऊत, तुमच्या धमक्यांना भाजप भीक घालत नाही- राणे

राऊतांचे धमक्या देण्याचे दिवस संपले; त्यांची जागा आता 'आतमध्ये'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक (मुंबई)

मुंबई : आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला होता. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्ष आणि यंत्रणांना चांगलंच धारेवर धरले होते. शिवसेना नेते आणि त्यांचे नातेवाईक यांना केंद्रीय संस्थांकडून टार्गेट केलं जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन सरकार पाडायचं काम केलं जात आहे, त्यामुळे ED चा भांडाफोड करणार असा इशारा देत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे वातावरण पुन्हा एकदा चांगलंच तापलं आहे. या केंद्रीय तपास यंत्रणेवर केलेल्या आरोपांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे तुमच्या धमक्यांना कोणी भीक घालत नाही आणि भाजप तर नाहीच अश्या शब्दात उत्तर दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पेटला आहे. (Narayan Rane Reply To Sanjay Raut)

नारायण राणे म्हणाले,

संजय राऊत यांचे वक्तव्य मुंबईचा दादा “ शिवसेना ”

पण ती फक्त “मातोश्रीपुरतीच ”. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या देण्याचे दिवस संजय राऊत आता संपले आहेत.

तुमची जागा बाहेर नाही आता “आत” तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही. अश्या शब्दात राऊतांच्या आरोपांना राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊतांचे आरोप काय?

दरम्यान, आज राऊत यांनी राज्यसभेचे अध्यक्ष तथा भारताचे उप-राष्ट्रपती वैंकय्या नायडू (M. Venkaiah Naidu) यांना पत्र लिहित तपास यंत्रणांकडून आपल्याला त्रास देण्यात येत असल्याचे खळबळजनक आरोप केले आहेत. काल (ता. ८ फेब्रुवारी) त्यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना (Hon'ble Chairman of Rajya Sabha) हे पत्र लिहिलं होतं, ज्यात तपास यंत्रणांकडून त्रास देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रातलं सरकार हे विरोधकांचा आवाज आणीबाणीपेक्षाही भयंकर वागतंय असं राऊत म्हणाले होते.

तसेच, यावेळी राऊत म्हणाले होते, ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे. आम्ही भाजपच्या नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाता येणार नाही. ईडीचा नकाब उतरवल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत दादागिरी चालणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. यावर राणेंनी संजय राऊत यांच्या वक्त्यव्यावर मुंबईचा दादा “ शिवसेना ” पण ती फक्त “मातोश्रीपुरतीच ” आहे असं म्हणत टोला लगावला आहे. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या देण्याचे दिवस आता संपले आहेत, अश्या शब्दात राणेंनी राऊतांना लक्ष्य केले आहे.

दरम्यान, तुम्ही मुंबईत दादागिरी करता, महाराष्ट्रातील लोकांना बाहेरची लोकं सुपाऱ्या घेऊन येतात. 12-12 तास डांबून ठेवतात. धमक्या देतात. मुंबई पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी असं माझं आवाहन आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं होत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT