नारायण राणेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक रवाना  Saam Tv
मुंबई/पुणे

नारायण राणेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवले आहे.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे : मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे, केंद्रीय मंत्री Union Minister नारायण राणे Narayan Rane यांना चांगलेच भोवले आहे. पुणे येथील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात रोहित रमेश कदम (रा. पाषाण) यांनी पोलिसांत Police नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनंतर नारायण राणे यांना अटक Arrested करण्यात यावे, असे आदेश काढण्यात आले आहेत. समाजामध्ये तेढ, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकतो. यानुसार पुणे पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्यात येऊ शकतो. पुणे पोलिसांची टीम चिपळूणच्या दिशेने रवाना झाली आहे. या पथका मध्ये दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

हे देखील पहा-

जनआशिर्वाद यात्रा निमित्त नारायण राणे आज चिपळूनमध्ये आहेत. याठिकाणी नाशिक पोलिसांची टीम पोहचल्यावर त्यांना अटक करणार असल्याचे समजत आहे. या सर्व घटनामुळे शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो, तर कानाखालीच वाजवली असती, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती.

जन आशीर्वाद यात्रेनिमित्त राणे यांनी महाडमधील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती.यात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, की प्रगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असा मुख्यमंत्री असणे ही महाराष्ट्राची अधोगती आहे. कोणत्याही विषयाचे त्यांना ज्ञान नाही. आपल्याला माहीत नसेल, तर सचिवाला विचारावे. त्यादिवशी स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव आहे काय, असे त्यांनी कोणाला तरी विचारले.

देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हे त्यांना माहीत नाही. माझ्यासारखा तिथे असता तर कानाखालीच वाजवली असती. बाळासाहेबांच्या आदर्शाला तिलांजली देऊन, गद्दारी करत ते मुख्यमंत्री झाल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली होती. पूरग्रस्तांबाबत राज्य सरकार योग्य मदतकार्य करत नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT