Narayan Rane Saam Tv
मुंबई/पुणे

Narayan Rane On Sanjay Raut: संजय राऊतांची तपासणी करण्याची वेळ आलीये, राणेंची राऊतांवर बोचरी टीका

संजय राऊतांची तपासणी करण्याची वेळ आली आहे. ते तणावाखाली चालले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : "संजय राऊतांची तपासणी करण्याची वेळ आली आहे. ते तणावाखाली चालले आहेत", असं म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केलीये. तसेच, यानंतर भाजपच्या कुठल्याही नेत्यावर काही आरोप केला तर त्याला तसंच उत्तर मिळणार असा इशाराही नारायण राणे यांनी संजय राऊतांना दिला (Narayan Rane on Sanjay Raut says he needs medical check up he is going in depression).

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन करत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर अनेक आरोप केले. तसेच, त्यापूर्वी त्यांनी भाजपचे साडे तीन नेते तुरुंगात जातील असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर भाजप विरुद्ध संजय राऊत हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यानंतर आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना जोरदार उत्तर दिलं आहे.

"संजय राऊतांची तपासणीची वेळ"

"संजय राऊतांची तपासणी करण्याची वेळ आली आहे. त्यांचा तोल गेलेला आहे. त्यांना काही गोष्टी आठवत नाहीत आणि त्यामुळे ते तणावाखाली चालले आहेत. संजय राऊतांनी काही काळ टीका आणि पत्रकार परिषद घेणे सोडून त्यांच्यावर जे ओढवलं आहे त्याला सामोरे जावं", अससं म्हणत नारायण राणे (Narayan Rane) यांनी राऊतांना सल्ला दिला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

SCROLL FOR NEXT