Cm Eknath Shinde On Narayan Rane Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: जागावाटपावरुन महायुतीत जुंपणार? भाजपने २८८ जागा लढवाव्या, नारायण राणे यांचं वक्तव्य; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

Cm Eknath Shinde On Narayan Rane: विधानसभा निवडणुकीत भाजपने २८८ जागा लढवाव्या, असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं. राणे यांच्या वक्तव्यावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने २८८ जागा लढवाव्या, असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या मित्र पक्षात एकच खळबळ उडाली आहे. आता नारायण राणे यांच्या वक्तव्यावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठिक आहे प्रत्येकाचं मत असतं, पण महायुती एकत्र निवडणूक लढवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नारायण राणे यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि खासदार नरेश म्हस्के यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ''नारायण राणे यांनी मांडलेल मत त्यांचं वैयक्तिक आहे. तेच जर 288 जागा लढवणार असतील तर मग ती महायुती कसली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, ''जागावाटपाचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बसून घेतील.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT