Narayan Rane News Saam tv
मुंबई/पुणे

Narayan Rane News: 'जय महाराष्ट्र उद्धवजी...'; नारायण राणे यांचा भरकार्यक्रमात फोन

Narayan Rane News: राज ठाकरे यांच्यानंतर आता नारायण राणे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी थेट उद्धव ठाकरेंना फोन केल्याचे दिसत आहे.

Vishal Gangurde

Narayan Rane News: संगीतकार, गायक, निर्माता आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते याचा 'खुपते तिथे गुप्ते' हा शो पुन्हा एकदा गाजत आहे. आता 'खुपते तिथे गुप्ते'चे नवे पर्व देखील प्रेक्षकांच्या पंसतीस उतरलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता नारायण राणे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी थेट उद्धव ठाकरेंना फोन केल्याचे दिसत आहे. तर या कार्यक्रमाचा नवा टीझर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. (Latest Marathi News)

'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाची पहिल्या शोनंतर प्रसिद्धी वाढली आहे. या नव्या पर्वाच्या पहिल्या भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. आता कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हजेरी लावली आहे. या भागाचा टीझर अवधूत गुप्तेने ट्विटरवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये दिसत आहे की, नारायण राणे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

नारायण राणेंचा थेट उद्धव ठाकरेंना फोन

या टीझरमध्ये नारायण राणे हे संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिसत आहे. 'माझ्यामुळेच संजय राऊत खासदार झाले, असा गौप्यस्फोट राणे यांनी टीझरमध्ये केला आहे. तसेच या टीझरमध्ये नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला. राणे यांनी बोलताना जय महाराष्ट्र उद्धवजी, मी नारायण राणे बोलतोय... अशी सुरुवात केली. नारायण राणे या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना पुढे नेमकं काय म्हणाले, हे १८ जून रोजी समोर येणार आहे.

दरम्यान, अवधूत गुप्ते याचा 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमातील हा भाग प्रेक्षकांना १८ जून रोजी रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात नेमकं नारायण राणे काय मजेशीर आणि राजकीय बोलणार यासाठी १८ जून रोजी कार्यक्रम पाहावा लागणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Grated Carrots : गाजर न किसता बनवता येईल हलवा, फॉलो करा 'ही' सिंपल ट्रिक

Ghodbunder Highway: ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार! घोडबंदर महामार्गाबाबत महत्त्वाची अपडेट

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज; लोकल गाड्या वेळेवर धावणार, मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान; नेमका काय? जाणून घ्या...

भाईचा बर्थडे..! सांगलीत 'मुळशी पॅर्टन', १० जणांसोबत स्टेजवर गेला, गुप्तीने अंगावर केले वार, वाढदिवसाच्या सेलीब्रेशनमध्ये दुहेरी हत्याकांड

SCROLL FOR NEXT