Shahada Dhadgaon Ghat 20 year old youth died in a bike accident Saam Tv News
मुंबई/पुणे

Nandurbar Accident : घाटात वळणाच्या रस्त्यावर दुचाकीला धडक, २० वर्षीय तरुणाचा जागीच अंत; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश

Nandurbar Accident : घाटातील वळणाच्या रस्त्यावर अज्ञात वाहनाने बाईकला मागून जोरदार धडक दिली. घाटातील कामोद गावाजवळ बाईक चालवणाऱ्या तरुणाला चिरडलं. या अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

Prashant Patil

नंदुरबार : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, नंदुरबारमध्ये पुन्हा एक अपघात झालाय. या अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. शहादा धडगाव घाटात मोटरसायकलचा भीषण अपघात झाला आहे. घाटातील वळणाच्या रस्त्यावर अज्ञात वाहनाने बाईकला मागून जोरदार धडक दिली. घाटातील कामोद गावाजवळ बाईक चालवणाऱ्या तरुणाला चिरडलं. या अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरुन फरार झाला. या दुर्घटनेबाबत धडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

दरम्यान, पुण्यातील शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे डंपर आणि पिकअपची जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या भिषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेत सागर संभाजी कोळपे (वय २८) आणि यश सुधाकर भिसे (वय १२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल बिरा कोळपे हे गंभीर जखमी झाले आहेत.

डंपर चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवत पिकअपला धडक दिली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. शिरूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.या घटनेने मांडवगण फराटा आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमी अनिल कोळपे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेला सुरुवात

Mamata Banerjee : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसमोर ड्रोनच्या घिरट्या; सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, नेमकं काय घडलं?

नाशिक म्हाडा घोटाळा ED कडे जाणार? बावनकुळे यांचा इशारा; 'त्या' 49 बिल्डरांचे धाबे दणाणले

Summer Hair Wash Tips: उन्हाळ्यात तुम्हीही केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात? मग केस धुण्याची ही ट्रिक करा फॉलो

Accident News : ड्युटी संपवून परतणाऱ्या पोलिसांच्या कारचा भीषण अपघात; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT