Mumbai News : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इरसाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदतकार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मदत वाढवून दिली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पुनर्वसन करताना एकट्या इर्शाळवाडीचे पुनर्वसन करुन चालणार नाही तर त्या भागातील धोकादायक सर्व गावांचे पुनर्वसन केले पाहिजे, अशीही मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, इर्शाळवाडी सारखी परिस्थिती कोकणात अनेक ठिकाणी आहे. पुनर्वसन करताना या सर्व भागाचाच विचार करावा लागणार आहे. पुनर्वसन करताना चांगल्या जागेत झाले पाहिजे.
माधव गाडगीळ समितीच्या आधारावर पुनर्वसनाची व्यवस्था करावी. निरपराध लोकांचा जीव जाणार नाही यासाठी अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेण्याची गरज आहे. मुंबईच्या जवळ असलेल्या या गावात अजून रस्ताही झालेला नाही. मी स्वतः जाऊन या लोकांशी संवाद साधला. आताही या लोकांचे अश्रू थांबलेले नाहीत, असंही नाना पटोलेय यांनी म्हटलं. (Latest NEws)
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर पोहोचली. कालपर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला होता. काल थांबलेलं बचावकार्य आज सकाळपासून पुन्हा सुरू झालं. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढले. त्यात दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.