Narendra Modi Saam TV
मुंबई/पुणे

'पंतप्रधानांनी छत्रपतींच्या महाराष्ट्राचा अपमान केला, जाहीर माफी मागा अन्यथा'...

''पंतप्रधानपदावर बसलेले व्यक्ती अजूनही भाजपची प्रचारक म्हणून वागत आहे.''

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई: काल नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेवरती गंभीर टीका केली होती. देशात कोरोना पसरवायला काँग्रेस जबाबदार असल्याचे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले होते. विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्राचा उल्लेख करुन टीका केली होती. त्यावर आता राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेवून मोदींवरती टीका केली आहे. पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती देशाची असते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मनाला तीव्र दुख: झाले आहे. पंतप्रधानपदावर बसलेले व्यक्ती अजूनही भाजपची प्रचारक म्हणून वागत असल्याची टीका काँग्रेस (Congress) प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (Nana Patole Criticize BJP And Narendra Modi)

पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी

पंतप्रधानांचं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. भाजपने आणि पंतप्रधानांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राने केले आहे. देशाला मदत करण्यात काम केलं. गुजरातमध्ये भूकंप आला तेव्हा महाराष्ट्राने सगळ्यात जास्त मदत केली. महाराष्ट्राने बाहेरून आलेल्या अनेकांना महाराष्ट्राने मोठं केलं. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी विनंती नाना पटोले यांनी केली आहे.

'...तर ते भाजपचे नेते महाराष्ट्र द्रोही'

उद्या भाजपच्या सर्व कार्यालयासमोर आम्ही महाराष्ट्राची माफी मागावी असे फलक घेऊन उभे राहणार आहोत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होते तेव्हा विरोधकांच्या आरोपांचे खंडन करून सरकारने काय केले हे सांगायचे असते. एकमेकांची खिल्ली उडवायची नसते. तातडीने लॉकडाऊन लावला तेव्हा हजारो लोकं चालत गेले. अनेकांचा जीव गेला. भाजपचे राज्यातील नेते समर्थन करत असतील तर ते महाराष्ट्र द्रोही आहे. गुजरातमधून १ हजार ३३ श्रमिक ट्रेन सोडल्या तर महाराष्ट्रातून ८०० ट्रेन सोडल्या. नमस्ते ट्रमचा कार्यक्रमाचा दाखला देत नाना पटोलेंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Rain Updates: जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार

Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

Monday Horoscope : आनंदात दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT