PMC election 2022 ward list Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची नावे जाहीर; प्रस्थापितांचे प्रभाग सुरक्षित

पुणे महापालिकेची प्रभाग रचना ही वादाची तसेच डावपेचांची झालेली आहे.

साम टिव्ही ब्युरो

ब्रिजमोहन पाटील

पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना उद्या जाहीर होणार असली तरी त्याची उत्सुकता ताणली गेली आहे. कोणता प्रभाग कसा होणार याची चर्चा सुरू असताना आज पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रारुप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची (PMC election 2022 ward list) नावे जाहीर झाली आहेत. शहरातला पहिला प्रभाग हा धानोरी-विश्रांतवाडी असून सर्वात शेवटचा ५८ क्रमांकाचा प्रभाग कात्रज-गोकुळनगर हा आहे. महत्त्वाचं म्हणजे नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या नावानेही सुमारे १० प्रभाग तयार झालेले आहेत. तसेच यामध्ये प्रस्थापित नगरसेवकांचे, पक्षनेते व पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे.

निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेला (Pune Muncipal Corporation) 1 फेब्रुवारी रोजी प्रारूप आराखडा जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत त्यावर 14 फेब्रुवारी पर्यंत हरकती-सूचना घेतला असून 2 मार्च पर्यंत अंतिम प्रभाग रचनेचा अहवाल सादर करावा लागणार आहे. पुणे महापालिकेची प्रभाग रचना ही वादाची तसेच डावपेचांची झालेली आहे. पुणे महापालिकेसह निवडणूक आयोगाकडे ही अनेक बदल करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची चर्चा आहे. पुणे महापालिकेतर्फे एक फेब्रुवारीला रात्री बारा वाजता महापालिकेच्या संकेतस्थळावर लिंक ओपन करून दिली जाणार आहे तेथे प्रभाग रचना नाव व चतुर सीमा नकाशा नागरिकांना पाहता येणार आहे.

ही आहेत प्रभागांची नावे (PMC election 2022 ward list)

1. धानोरी – विश्रांतवाडी

2. टिंगरेनगर – संजय पार्क

3. लोहगाव - विमान नगर

4. वाघोली – इऑन आयटी पार्क

5. खराडी – चंदननगर

6. वडगावशेरी

7. कल्याणीनगर – नागपूर चाळ

8. कळस – फुलेनगर

9. येरवडा

10. शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी

11. बोपोडी – पुणे विद्यापीठ

12. औंध – बालेवाडी

13. बाणेर – सुस म्हाळुंगे

14. पाषाण – बावधन बुद्रुक

15. पंचवटी – गोखलेनगर

16. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे

17. शनिवार पेठ – राजेंद्रनगर

18. शनिवार वाडा – कसबा पेठ

19. रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटल

20. पुणे स्टेशन – ताडीवाला रोड

21. मुंढवा – घोरपडी

22. मांजरी – शेवाळवाडी

23. साडेसतरानळी – आकाशवाणी

24. मगरपट्टा – साधना विद्यालय

25. हडपसर गावठाण – सातववाडी

26. भीमनगर – रामटेकडी

27. कासेवाडी – हरकानगर

28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट

29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई

30. जयभवानी नगर – केळेवाडी

31. कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर

32. भुसारी कॉलनी – सुतारदरा

33. बावधन खुर्द – महात्मा सोसायटी

34. वारजे – कोंढवे धावडे

35. रामनगर – उत्तमनगर शिवणे

36. कर्वेनगर

37. जनता वसाहत – दत्तवाडी

38. शिवदर्शन - पद्मावती

39. मार्केटयार्ड – महर्षी नगर

40. गंगाधाम – सॅलीसबरी पार्क

41. कोंढवा खुर्द - मिठानगर

42. सय्यदनगर – लुल्लानगर

43. वानवडी – कौसरबाग

44. काळेपडळ – ससाणेनगर

45. फुरसुंगी

46. मोहम्मदवाडी – उरुळी देवाची

47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी

48. अप्पर सुपर इंदिरानगर

49. बालाजीनगर – के के मार्केट

50. सहकारनगर – तळजाई

51. वडगाव – पाचगाव पर्वती

52. नांदेडसिटी – सनसिटी

53. खडकवासला -नऱ्हे

54. धायरी – आंबेगाव

55. धनकवडी – आंबेगाव पठार

56. चैतन्यनगर – भारती विद्यापीठ

57. सुखसागर नगर – राजीव गांधी नगर

58. कात्रज – गोकुळनगर

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT