Crime Saam tv News
मुंबई/पुणे

Crime News: बहिणीचा जास्त लाड पाहून भावाच्या डोक्यात सैतान झाला जागा; चित्रपटाच्या सीनप्रमाणे चेहराच ठेचला

Nalasopara crime news: एका १३ वर्षांच्या मुलानं आपल्या ५ वर्षांच्या मामेबहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

एका १३ वर्षांच्या मुलानं आपल्या ५ वर्षांच्या मामेबहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संतापजक घटना नालासोपारात घडली आहे.

कुटुंबातील प्रत्येकजण आपल्या मामेबहिणीचे लाड करत असल्यामुळे भावानं आपल्या बहिणीची हत्या केली आहे. रागाच्या भरात त्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मुलाला ताब्यात घेतलं असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान हे नालासोपारा पूर्व येथील श्रीराम नगर येथे राहतात. त्यांना २ मुली आहेत. त्यांची बहीण त्यांच्या घरासमोरच राहते. कामावरून येताना त्यानं आपल्या लहान मुलीला शाळेतून आणले. सायंकाळी lती खेळायला गेली. परंतु चिमुकली पुन्हा घरी परतलीच नाही.

चिमुकली घरी न परतल्यामुळे तिचा शोध घेण्यात येत होता. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये खान यांचा मुलगा चिमुकलीला घेऊन जात असल्याचं निर्दशनास आले. मुलाकडे चौकशी केली असता, एका अज्ञात व्यक्तीनं चिमुकलीला मारल्याचं सांगितले.

घाबरलेल्या कुटुंबाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मुलीचा तपास केला असता, मुलीचा मृतदेह श्रीराम टेकडीवर आढळला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी मुलाची चौकशी केली. सुरूवातीला त्यानं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्यानं गुन्हा कबुल केला.

कुटुंबातील प्रत्येक जण आपल्या बहिणीचे लाड करतात. याच रागातून त्यानं तिला संपवलं. अल्पवयीन मुलाने दिलेल्या माहितीनुसार, हत्येपूर्वी त्यानं रमन राघवन २ हा चित्रपट पाहिला होता.

त्यानं आधी मामे बहिणीला डोंगरावर नेलं नंतर गळा आवळून हत्या केली, नंतर दगडानं चेहरा ठेचला. या प्रकरणानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT