shivsainik, nagar, eknath shinde saam tv
मुंबई/पुणे

Nagar : नगरचे शिवसैनिक मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे गटात दाखल

नगर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे.

सचिन आगरवाल

नगर : राज्याचे (maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना (shivsena) पदाधिकारी व नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अहमदनगर शहरातील काही आजी, माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाऊन आले आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर अनिल शिंदे यांनी पेढे वाटत आनंद व्यक्त केला होता. त्यामुळे नगर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Nagar Latest Marathi News)

शिवसेनेचे अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांचे चिरंजिव नगरसेवक योगीराज गाडे यांचाही समावेश आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. नगरसेवक योगीराज गाडे, शशिकांत गाडे यांचे बंधू रमाकांत गाडे, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, मदन आढाव, सुभाष लोंढे, माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अनिल लोखंडे, चंद्रकांत शेळके, आकाश कातोरे आदींचा यात समावेश आहे.

Eknath Shinde With Nagar Shivsainik

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरच्या शिवसैनिकांचे आभार मानत. त्यांनी सूचविलेल्या गाेष्टी केल्या जातील असं आश्वासन दिलं आहे. शिवसैनिक माेठ्या संख्येने शिंदे गटात गेल्याने नगर शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

Shocking : धक्कादायक! सावत्र भावानेच नेलं बहिणीला पळवून; असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

Aloe Vera Juice: घरी कोरफडचा रस कसा बनवायचा? सोपी आहे पद्धत

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! आज वाहतुकीत मोठे बदल, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सरकारच्या हालचाली;₹१५००बाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT