Nagar-Kalyan Highway Accident Saam TV
मुंबई/पुणे

Nagar-Kalyan Highway Accident: नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन चिमुकल्यांसह ८ जणांचा जागीच मृत्यू

Nagar-Kalyan Highway Accident: नगर-कल्याण महामार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये दोन चिमुकल्यांसह ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

रोहिदास गाडगे

Nagar-Kalyan Highway Accident

नगर-कल्याण महामार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. जुन्नर तालुक्यातील अंजिराची बाग परिसरात ट्रकने रिक्षा आणि पिकअपला जोरदार धडक दिली. या तिहेरी अपघातात दोन चिमुकल्यांसह ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा समावेश आहे. गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५ वर्ष ) हर्षद मस्करे (वय ४ वर्ष) काव्या मस्करे (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची नवे अद्याप समोर आली नाही. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती, पत्नी आणि दोन लहान मुलांसह रिक्षाने प्रवास करीत होते. यावेळी जुन्नर तालुक्यातील (Pune News) डिंगोरे गावाजवळील अंजिराची बाग येथे त्यांच्या रिक्षाला ट्रक आणि पिकअपने जोरदार धडक दिली.

हा अपघात (Accident) इतका भीषण होता, की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत गणेश मस्करे, कोमल मस्करे त्यांची दोन चिमुकली मुलं, यांच्यासह ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आठही जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी ओतूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud-Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

SCROLL FOR NEXT