smita asthekar , eknath shinde, nagar , shivsena saam tv
मुंबई/पुणे

विसरू नका, मी काय कांड केले माहितीहेत ना ! सेनेच्या महिला संघटकाचा एकनाथ शिंदे गटास इशारा

स्मिता अष्टेकर या ठाकरे गटाच्या कट्टर समर्थक मानल्या जातात.

सचिन आगरवाल

नगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी नगर (nagar) शहरातील नगरसेवक फोडण्याचे काम थांबवावे अन्यथा त्यांना काळे फासले जाईल असा इशारा शिवसेनेच्या (shivsena) माजी पदाधिकारी स्मिता अष्टेकर (smita asthekar) यांनी दिला. नगर शहरातील नगरसेवक जर शिंदे गटात गेले तर त्यांनाही काळे फासले जाईल असा ही इशारा अष्टेकर यांनी नगरसेवकांना दिला आहे. (smita asthekar latest marathi news)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर माेठ्या अडचणी उभ्या केल्या आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटात सहभागी हाेण्यासाठी लाेकप्रतिनिधींची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. त्यांना थांबविण्यासाठी शिवसेना राजकीय आणि कायदेशीर प्रक्रियेचे डावपेच खेळत आहे. (eknath shinde latest news)

दरम्यान शिवसेना फुटीवर रामबाण उपाय म्हणून नगर येथील महिला आघाडीच्या प्रमुख स्मिता अष्टेकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष केले आहे. अष्टेकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंना काळे फासण्याचा इशारा माध्यमांशी बाेलताना दिला आहे.

अष्टेकर म्हणाल्या नगर येथील नगरसेवक शिंदे गटात गेले तर त्यांना आमची महिला आघाडी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेना स्टाइलने उत्तर देईल. बंडखोरांच्या तोंडाला काळे फासले जाईल असेही त्यांनी नमूद केले.

अष्टेकर या शिवसेनेच्या कट्टर समर्थक आहेत. आजपर्यंत त्यांच्या माध्यमातून नगर शहरात शिवसेनेने वेगवेगळ्या विषयांवर आक्रमक आंदोलनं छेडली आहेत. माध्यमांशी बाेलताना त्यांनी माझे प्रकरण विसरू नका मी काय कांड केले हे तुम्हाला माहितहेत असेही नमूद करीत स्थानिक बंडखाेरांना इशारा दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT