Sharad Pawar/ Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

"मविआ'चा कत्तलखाना समोर आणला, मतांसाठी मुख्यमंत्र्यांची लाचारी "

'आजच भाषण शिवाजी पार्कवरील भाषण होते ते दिल्लीला गेले काश्मीरला गेले पण मुंबईवर बोलले नाही.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाषण केलं. त्यांच्या भाषणानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अधिवेशाच्या बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यावरती निशाना साधला.

आज संपलं आहे कुठल्याही विषयाला हे सरकार उत्तर देऊ शकले नाही. आम्ही भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडले पण यांनी कुठलेही उत्तर दिले नाही. महाविकास आघाडीचा कत्तलखाना आम्ही समोर आणला आमच्या आमदारांबाबत कसे हे कटकारस्थान करतात हे आम्ही दाखवलं आम्हाला CID मान्य नाही. आम्ही हायकोर्टात गेलो असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

NA टॅक्स बाबत देखील आम्ही पाठपुरावा केला तो देखील या सरकारने स्थगित केला राज्याच्या शेतकऱ्यांसाठी कुठलीही घोषणा झाली नाही. विदर्भ मराठवाडा (Vidarbha Marathwada) वॉटर ग्रीडचा प्रश्न आम्ही मांडला विदर्भ आणि मराठा प्रश्नावर बोलताना आम्ही किती पैसे दिले हे विचारले पण यांनी त्याचे उत्तर देखील दिले नाही पहिल्या दिवसापासून आम्ही पाठपुरावा करत होतो विदर्भ आणि मराठावाडा सबसिडीचे पैसे मागत होतो पण यांनी काहीच उत्तर दिले नाही. पेट्रोल-डिझेल दरवाडी आंदोलन करणारे कॉंग्रेस (Congress) दुटप्पी आहे.

या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दोन भाषण केले. आजच भाषण शिवाजी पार्कवरील भाषण होते ते दिल्लीला गेले काश्मीरला गेले पण मुंबईवर बोलले नाही. मुख्यमंत्री नवाब मलिक यांचे समर्थन करत आहेत ही मतांची लाचारी आहे. आज त्यांचा चेहरा समोर आला आहे. आज स्पष्ट झाले की मुंबई बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्याचे ते समर्थन करत आहेत असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यावर केले.

Edited By - jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

Monsoon Update 2026 : मान्सून सर्वात शेवटी कोणत्या राज्यात पोहोचतो? कारण जाणून घ्या

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये डोमेस्टिक गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; 251 सिलेंडर जप्त

SCROLL FOR NEXT