Devendra Fadnavis On RajyaSabha Candidate Saam TV
मुंबई/पुणे

आम्हाला घोडेबाजार करायचा नाही; मविआने एक उमेदवार मागे घ्यावा - फडणवीस

'सदसद्‌विवेकबुद्धीने आमचे उमेदवार निवडून येतील, आम्ही विचारपूर्वक फॉर्म भरलेला आहे'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार असे ६ उमेदवार राज्यसभेवर जायला हवेत, त्यासाठी महाविकास आघाडीने आपला एक उमेदवार मागे घ्यावा. आम्ही विचारपूर्वक तीन उमेदवारांचे अर्ज भरले असून आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे.

राज्यातून भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (BJP, Shivsena, Congress and NCP) या पक्षातील राज्यसभेचे उमेदवार निश्चित झाले आहेत. शिवसेनेचे २ काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक उमेदवार कालच निश्चित झाले होते. भाजपने देखील आपले दोन उमेदवार काल जाहीर केले होते. मात्र, भाजपकडून आता आणखी एक उमेदवार राज्यसभेसाठी (RajyaSabha) दिला आहे.

हे देखील पाहा -

त्यामुळे आता भाजपकडून माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, पियूष गोयल यांच्यासह आता धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना देखील राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. या तिन्ही उमेदवाराची उमेदवारी आम्ही दाखल केली आहे. याच पार्श्वभूमिवर पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीने आपला एक उमेदवार मागे घ्यावा असा सल्ला देखील दिला आहे.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, आज आम्ही ३ उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तसंच हे उमेदवार राज्यातून निवडून जात आहेत. डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) हे कृषिमंत्री राहिलेले आहेत. ते कृषी क्षेत्रातले तज्ञ आहेत. मुन्ना महाडिक आमचे तिसरे उमेदवार आहेत. मला विश्वास आहे आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. महाविकास आघाडीने आपला एक उमेदवार मागे घ्यावा. सदसद्‌विवेकबुद्धीने आमचे उमेदवार निवडून येतील. आम्ही विचारपूर्वक फॉर्म भरलेला आहे. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

India Russia Deal 2026: ३००० सैनिक, ५ युद्धनौका अन्...; भारत-रशियामध्ये मोठा लष्करी करार, पाकिस्तानची चिंता वाढली

FASTag पासच्या नावाखाली होतेय फसवणूक, एका चुकीमुळे होईल अकाउंट रिकामं; NHAI ने केलं अलर्ट

Face Fat Yoga: हनुवटी आणि गळ्यावरची चरबी ७ दिवसात करा कमी रोज फक्त १० मिनिट करा 'हा' फेस योगा

Heart Attack Women: सावधान! हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभरआधी महिलांमध्ये दिसतात ही सामान्य लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरेल घातक

SCROLL FOR NEXT