धक्कादायक कौटुंबिक वादातून केली चिमुकलीची निर्घृण हत्या! Saam TV
मुंबई/पुणे

धक्कादायक|कौटुंबिक वादातून केली चिमुकलीची निर्घृण हत्या!

८ वर्षीय मुलीची शेजाऱ्याने केली हत्या.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर - पालघर Palghar मध्ये कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणामध्ये एका व्यक्तीने कोयत्याने वार करून 8 वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या Murder केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.डहाणूतील रानशेत येथील घटना ही घटना असून वर्षा या ८ वर्षीय चिमुकिलीची शेजाऱ्याकडून हत्या झाली आहे. दरम्यान वर्षाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवरती देखील आरोपी कडून कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे.(Murder of a little girl in a family dispute)

हे देखील पहा -

आठ वर्षीय वर्षा घोसे या चिमुकिलीची एका ४२ वषीय आरोपी असलेल्या शेजाऱ्याने हत्या केलीय यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रफुल उर्फ प्रमोद घोसे ( वय ४२) असं आरोपीच नाव असून चिमुकलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यावरही आरोपी कडून कोयत्याने हल्ला केल्याने हल्ल्यात शेजारीच राहणारे विलास दोलाडे हे गंभिर जखमी झाले असून त्यांच्यावरती डहाणूतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे आहे.

सदर आरोपीं विरोधात भादंवीस कलम ३०२ आणि ३०७ अंतर्गत डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डहाणू पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. तर या घटनेचा पुढील तपास डहाणू पोलीस करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT