3ऱ्या लाटेसाठी महापालिका खासगी रुग्णालयांचे बेड ताब्यात घेणार 
मुंबई/पुणे

3ऱ्या लाटेसाठी महापालिका खासगी रुग्णालयांचे बेड ताब्यात घेणार

कोरोनाच्या (Covid 19) तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका पुणे आणि मुंबई शहरांसाठी वर्तवला गेलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अश्विनी जाधव केदारी

पुणे- कोरोनाच्या (Covid 19) तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका पुणे आणि मुंबई शहरांसाठी वर्तवला गेलाय. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सज्ज झाली आहे. खाजगी रुग्णालयांना बेड ताब्यात घेण्यासंदर्भात पालिकेने पत्रव्यवहार केला असून कोरोनाच्या 2 लाटेचा अनुभव पाहता 3 ऱ्या लाटेसाठी (Covid 19 third wave) तयार असल्याचे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती याबाबत माहिती दिली आहे.

हे देखील पहा-

यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कधीही बेड ताब्यात घेतले जातील, त्यामुळे तयारीत रहा, अशा आशयाचे पत्र पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व खासगी रुग्णालयांना पाठवले आहे. यापूर्वी कोरोनाच्या दोन लाटांमध्ये सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त बेड म्हणजे सुमारे 80 टक्के बेड खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेतले होते. त्यामध्ये साधे, ऑक्सिजनयुक्त, अतिदक्षता विभागातील आणि व्हेंटिलेटर बेडचा समावेश होता.

कालांतराने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बाधितांची संख्या खूप वेगाने वाढली. पण त्यानंतर जुलैमध्ये रुग्णसंख्या पुन्हा कमी होण्याला सुरूवात झाल्याने नियंत्रणाखाली आणलेल्या 80 टक्के बेडपैकी 50 टक्के बेड हे रुग्णालयांना अन्य रुग्णांसाठी वापरण्याला परवानगी दिली. आता मात्र पुन्हा 3 ऱ्या लाटेचा धोका ओळखून महापालिकेने खाजगी रुग्णालयांना बेड कधीही ताब्यात घेऊ यासंदर्भात आदेश दिले असल्याचे आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती यांनी सांगितले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेने बेड व्यवस्थापनासंबंधी आरोग्य विभागाला सूचना केल्या आहेत, दरम्यान , आता रुग्णालयांनीही कोविड नियंत्रणाची तयारी सुरू करावी , असे  पालिकेने दिलेल्या या पत्राद्वारे कळवण्यात आले आहे, दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे डॉक्टर सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT