Mumbai Nalasopara Western Local Station News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local News : रेल्वे प्रवाशांना लागणार शिस्त; अपघाताचं प्रमाण होणार कमी, काय आहे रेल्वे प्रशासनाचा नवा उपक्रम?

Mumbai Nalasopara Western Local Station News : मुंबई लोकलमधील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नालासोपारा स्थानकावर पश्चिम रेल्वेकडून रांगेतून लोकल पकडण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • नालासोपारा स्थानकावर रांगेत लोकल पकडण्याची नवी पद्धत सुरू

  • प्रवासी सुरक्षेसाठी आरपीएफ-एमएसएफची संयुक्त तैनाती

  • नियमित घोषणा व प्रवाशांशी संवादाद्वारे जनजागृती

  • प्रयोग यशस्वी झाल्यास इतर स्थानकांवरही विस्तार होणार

मुंबई लोकलमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. या गर्दीचे अनेक शिकार होत असून याबाबतीत रेल्वेने अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. तरीही प्रवासी अनेकदा नियमभंग करून प्रवास करताना आढळत आहेत. अशातच पश्चिम रेल्वेने नालासोपारा रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष गर्दी व्यवस्थापन मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेअंतगर्त प्रवाशांना रांगेत लोकल पकडावी लागणार आहे. उपनगरीय गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या सहाय्यक सुरक्षा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली काटेकोरपणे अंमलात आणली जात आहे. या मोहिमेअंतर्गत, प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर व्यवस्थित रांगेत उभे राहण्यास सूचना देऊन प्रोत्साहित केले जात आहे.

ट्रेन येण्यापूर्वी नियमित घोषणा केल्या जाणार आहे. हा प्रयोग सध्या नालासोपारा स्टेशनवर प्रायोगिक तत्वावर केला जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर स्थानकांवर देखील सुरु केली जाणार आहे. सुरक्षा बळकट करण्यासाठी आरपीएफ आणि एमएसएफ कर्मचाऱ्यांची संयुक्त टीम तैनात करण्यात येणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत अधिकारी प्रवाशांशी वैयक्तिकरित्या संवाद साधणार आहेत आणि त्यांना नियमांचे पालन करण्याबाबत जागरूक करणार आहेत. रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे की, या सकारात्मक उपक्रमामुळे प्लॅटफॉर्मवर शिस्त वाढेल, अपघातांची शक्यता कमी होईल आणि प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT