Water Supply Water Level In Mumbai  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ इतकाच पाणीसाठा; बुधवारपासून १० टक्के पाणीकपात

Mumbai Water News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात केवळ ७.५९ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.

Satish Daud

मुंबईकरांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणात सध्या केवळ ७.५९ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.

गेल्या तीन वर्षातील हा सर्वात कमी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी म्हणजेच २०२३ मध्ये आजच्या दिवशी सातही धरणांमध्ये १२.२८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्याआधीच्या वर्षी जूनमध्ये मुंबईतील धरणांमध्ये १७.०३ टक्के पाणीसाठा होता.

धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने मुंबई महापालिकेने ३० मेपासून ५ टक्के पाणीकपात लागू केली आहे. बुधवार ५ जूनपासून या पाणीकपात आणखी भर पडणार असून १० टक्के पाणीकपात लागू होईल, असं महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणांमधील पाणीसाठा कमा झाल्याने राज्य सरकारने महापालिकेला भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील पाणी वापरण्यास परवानगी दिली आहे. यातील उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे भातसा धरणात केवळ साडेतीन टक्के पाणी शिल्लक आहे. येत्या काही दिवसात या धरणातील राखीव साठ्याचा वापरलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा लागणार आहे. कारण शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आता राखीव पाणीसाठ्यावरच आहे.

कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक?

  • उर्ध्व वैतरणा धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

  • मोडक सागर धरणात १५.५७ टक्के इतका पाणीसाठा आहे.

  • तानसा धरणातील पाणीसाठा २६.१२ टक्क्यांवर आला आहे.

  • मध्य वैतरणा धरणात १०.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

  • भातसा धरणातील पाणीसाठा ३.३३ टक्के इतका आहे.

  • विहार धरणात २०.१६ टक्के पाणीसाठा उरला आहे.

  • तुलसी धरणात २८.७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक,राजस्थानहून आरोपी अटकेत

Mangalsutra Designs: पारंपारिक की मॉडर्न? लग्नासाठी मंगळसूत्राच्या कोणत्या डिझाईन शोभून दिसतील?

Tea and Biscuits Combo: चहासोबत बिस्किटं खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात?

PM Mudra Yojana: सरकारची खास योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज; कोणाला होणार फायदा?

Samrat Choudhary: लाखोंची एफडी, कित्येक तोळा सोनं,भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT