Water Cut Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Issue: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, गुरुवारी 'या' भागात पाणीपुरवठा बंद राहणार

Mumbai Water Issue: मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक २ ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई शहरातील काही भागांत पाणीपुरवठ्यामध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

आवेश तांदळे, मुंबई

Mumbai Water Supply:

मुंबई महापालिकेतर्फे मलबार हिल जलायशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आलं आहे. यासाठी आय.आय.टी. पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. या कामाअंतर्गत तज्ज्ञ समितीमार्फत गुरूवारी मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक २ ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई शहरातील काही भागांत पाणीपुरवठ्यामध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

मुंबई महापालिकेच्या तज्ज्ञ समितीकडून ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत मलबार हिल जलाशयाची पाहणी करण्यात येणार आहे. जलाशयामधील कप्पा रिक्त केल्याने मुंबई शहरातील मलबार हिल जवळील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘ए’ विभाग-

कफ परेड व आंबेडकर नगर – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.२० ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत)- या ठिकाणी १०० टक्के पाणीपुरवठा बंद राहील.

नरिमन पॉईट व जी. डी. सोमाणी – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.४५ ते ३ वाजेपर्यंत) - पाणीपुरवठ्यात ५० टक्के पाणीपुरवठ्यात करण्यात येईल.

मिलीट्री झोन- (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – २४ तास) – पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात करण्यात येईल.

मलबार हिल आणि आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवठा होणारे 'ए' विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) - पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

सी विभाग-

मलबार हिल आणि आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे 'सी' विभागातील सर्व क्षेत्र – पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

डी विभाग-

पेडर रोड- (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी १ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत) – पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात येईल.

मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे 'डी' विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.)

जी उत्तर आणि जी दक्षिण विभाग-

जी उत्तर आणि जी दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग – पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT