Mumbai Water Supply Cut News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Shortage : मुंबईत पाणीबाणी! 'या' भागांतील पाणीपुरवठा १४ तास राहणार बंद; वाचा A To Z माहिती

Mumbai Water Supply Cut News : मुंबईतील वांद्रे पश्चिम व खार परिसरात जलवाहिनी दुरुस्तीमुळे १४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही भागांत कमी दाबाने पाणी मिळणार असून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेने केले आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईतील काही भागांत १४ तास पाणीपुरवठा बंद

  • जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे अत्यावश्यक काम

  • काही भागांत पूर्ण बंद, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी

  • नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

Mumbai Water Cut For 14 hours On 10th February राज्यात किमान तापमानात हळूहळू वाढ होत असल्याने ऐन थंडीच्या काळात नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत. अशातच आता मुंबईकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहेत. शहरातील काही भागांमध्ये १४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु राहील. जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. या दरम्यान नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पालिकेने केले आहे.

पाली हिल जलाशयाच्या ९०० मि.मी. इनलेट जलवाहिनीवर गळती आढळून आली आहे. ती दुरुस्ती करणं आवश्यक असल्याने, हे काम वांद्रे पश्चिमेतील कुरेशी नगर झोपडपट्टीजवळील एमएचएडीएच्या मोकळ्या भूखंडातून, तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गालगत जाणाऱ्या जलवाहिनीवर करण्यात येईल. या दुरुस्तीमुळे एच-पश्चिम विभागातील मोठ्या परिसरावर पाणी पुरवठ्याचा परिणाम होणार आहे.

त्यामुळे मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत तब्बल १४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही भागांत पाणीपुरवठा पूर्णतः खंडित राहील, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळणार असल्याचं पालिकेने म्हटलं आहे.

'या' भागातील पाणीपुरवठा बंद राहणार!

मुंबई शहरातील वांद्रे पश्चिमेकडील हिल रोड, पाली हिल, कार्टर रोड, सेंट अँड्र्यूज मार्ग, पाली गाव, चिंबई, शेर्ली गाव, कांतवाडी तसेच खार दांडा, कोळीवाडा, दांडा पाडा, चुईम गावठाण, खार पश्चिमेतील काही भागात , माउंट मेरी परिसर, के.सी. मार्ग, बाजार रस्ता, पाली माला, कोल डोंगरी, नर्गिस दत्त मार्ग पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. हिल रोडच्या टोकापासून ताज लँड्स एन्ड, बी. जे. मार्ग, एच.के. भाभा मार्ग, काणे मार्ग आणि गणेश झोपडपट्टी परिसरात मध्यरात्रीनंतर १ ते पहाटे ४.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney failure warning signs: शरीरात हे मोठे बदल दिसले तर समजा किडनी फेल होणारे; डॉक्टरांनी स्पष्ट केली लक्षणं

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! HSRP नंबरप्लेट बसवा, अन्यथा दररोज ₹१००० दंड

Lagnanantar Hoilach Prem : जीवा-नंदिनीचा घटस्फोट होणार; काव्या-पार्थच्या नात्याचे काय? मालिका घेणार धक्कादायक वळण|VIDEO

Crime News: भाजप नगरसेवकाच्या तिसऱ्या पत्नीवर चाकू हल्ला; रिक्षात बसताना मुलाने डाव साधला

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मानले मतदारांचे आभार

SCROLL FOR NEXT