BA Exam Result  SAAM TV
मुंबई/पुणे

BA Exam Result : मुंबई विद्यापीठाच्या BA सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर, 'या' ठिकाणी पाहता येईल निकाल

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीए सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

BA Result Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या अंतिम वर्षाच्या नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या हिवाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीए सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

बीए सत्र ५ च्या परीक्षेमध्ये एकूण ३ हजार ७१४ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १२ हजार १४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ हजार ८०६ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर ३४३ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ७३८८ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. बीए सत्र ५ चा निकाल ३३.४५ टक्के लागला आहे. (Latest Marathi News)

बीए सत्र ५ सोबत बीए इन मल्टिमीडिया अँड मास कम्युनिकेशन सत्र ६ , बीकॉम अकाऊंट अँड फायनान्स सत्र ५ ( ७५:२५ ओल्ड टू रीवाइज), बीकॉम अकाऊंट अँड फायनान्स सत्र ६ (७५:२५ ओल्ड टू रीवाइज), बीई सिव्हील इंजिनियरिंग सत्र ७ (सीबीसीएस सी स्कीम ) या परीक्षांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. (Exam Result)

विद्यापीठाने आजपर्यंत २०२२ च्या हिवाळी सत्राचे १०९ निकाल जाहीर केले आहेत. आज ५ परीक्षांचे निकाल जाहीर केले. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. (Mumbai University)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT