Amol Kirtikar Saam Tv
मुंबई/पुणे

Amol Kirtikar: मोठी बातमी! ठाकरे गटाला मोठा धक्का, अमोल कीर्तिकरांना मतमोजणीचे CCTV फुटेज देण्यास नकार

Refuse To Provide CCTV Footage Of Vote Counting Center To Amol Kirtikar: वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रविंद्र वायकर यांनी अमोल कीर्तिकरांचा केवळ ४५ मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

Rohini Gudaghe

गिरीश कांबळे, साम टीव्ही मुंबई

महाविकास आघाडीचे महायुतीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज मागणी केली होती. परंतु अमोल कीर्तीकर यांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार दिला आहे. मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही उमेदवारास देणे हे कायद्यात बसत नसल्याचं कारण दिल्याची माहिती मिळत आहे.

या उत्तरानंतर निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या निकालाला आव्हान देण्यासाठी अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) कोर्टात जाण्याची तयारीत आहेत. सगळ्या मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप अमोल कीर्तीकर यांनी केला आहे. शिवाय त्यांनी ईव्हीएम मशीन मतांची फेर मतमोजणीची विनंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली.

मात्र, निकालाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेर मतमोजणी नाकारली होती. निकालाच्या चार दिवसानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना (Vote Counting Center) सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासंदर्भात अमोल कीर्तिकर यांनी पत्र दिले होते. मतमोजणी केंद्रामध्ये गोंधळ झाल्याचे सांगत ४ जून रोजीचे दुपारी चार ते रात्री आठच्या दरम्यान मतमोजणी केंद्रावर जे काही घडलं त्याचे सीसीटीव्ही फुटेज कीर्तिकरांनी मागितले होते.

आता यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी अमोल कीर्तिकर यांनी दिलेल्या विनंती पत्रानंतर मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला (Lok Sabha Election) आहे. अशाप्रकारे सीसीटीव्ही फुटेज देणे कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याची बाब निवडणूक अधिकाऱ्यांनी अमोल कीर्तीकरांसमोर आणली असल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक आयोगाचे नियमाचे संदर्भ देऊन सदरचे फूटेज देण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे.

त्यामुळे या उत्तरानंतर निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या निकालाला आव्हान देण्यासाठी अमोल कीर्तीकर (Mumbai Suburban District Collector) कोर्टात जाण्याची तयारीत आहेत. अमोल कीर्तीकर यांनी यासगळ्या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा पत्र दिले आहे. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकरांचा केवळ ४५ मतांनी पराभव झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

SCROLL FOR NEXT