Sachin Waze News Saam Tv news
मुंबई/पुणे

Breaking News : सचिन वाझेंना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; पण सुटका नाहीच, कारण...

मनी लॉंड्रिग प्रकरणात अटकेत असलेले माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sachin Waze News : मनी लॉंड्रिग प्रकरणात अटकेत असलेले माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने मनी लॉंड्रिग प्रकरणात वाझे यांचा जामीन मंजूर केला आहे.  ईडीच्या प्रकरणात वाझेंना (Sachin Waze) जामीन मिळाला असला तरी इतर प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने सध्यातरी वाझेंचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे.  (Sachin Waze Latest Marathi News)

मनी लॉंड्रिग प्रकरणासह अन्य आरोपाखाली तुरूंगात असलेले माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सचिन वाझे यांना जामीन दिल्यास ते पुराव्याशी छेडछाड करू शकतात, असं सांगत ईडीने वाझे यांच्या जामीनाला विरोध केला होता.

मात्र दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Court) सचिन वाझे यांना मनी लॉंड्रिग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, सचिन वाझे यांना मनी लॉंड्रिग प्रकरणात जामीन मिळाला असला तरी त्यांचा मुक्काम तुरूंगातच राहणार आहे. कारण, वाझे यांना इतर प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती.

दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचे सचिन वाझेंनी तपासादरम्यान सांगितले होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात महत्त्वाचे बदल, थेट तुमच्यावर होणार परिणाम

Famous Actress : लग्नाच्या ४ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री घेणार घटस्फोट? नवऱ्याला केले अनफॉलो, लग्नाचे फोटोही Delete

Digital Eye Strain: डोळे जळजळणं किंवा खाज येणं याला थकवा समजू नका; या गंभीर समस्यांचा असू शकतो इशारा

रुपाली चाकणकर यांना ईडीकडून समन्स? राजकीय वर्तुळात खळबळ, VIDEO

Cricket Ball Weight: तुम्हाला माहितीये का क्रिकेट बॉलचं वजन काय असतं?

SCROLL FOR NEXT