Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : धावती लोकल पकडताना शिक्षिकेचा पाय घसरला अन्...थरकाप उडवणारा व्हिडिओ

बोरिवली रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumabi News : कामावर जायला उशीर झाल्यानंतर अनेकजण धावत्या लोकलमधे चढण्याचा प्रयत्न करतात, यामुळे अनेकदा अपघात देखील होतात. आतापर्यंत रेल्वे पकडताना अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. आता अशीच एक घटना बोरिवलीत रेल्वे स्थानकात घडली आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरिवली स्थानकावरुन लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना खाली पडून जखमी झालेल्या शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे.

प्रगती घरत (४३) असं या शिक्षिकेचं नाव आहे. प्रगती घरत या मालाड येथील एका शाळेत शिक्षिका होत्या. त्या वसई इथं राहत होत्या. त्या दर दिवशी बोरिवली (Borivali) इथं ट्रेन बदलायच्या. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या बोरिवली स्थानकावर उतरल्या.

प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून सुटणाऱ्या चर्चगेट ट्रेनच्या (Train) सेकंड क्लासच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. मात्र, ट्रेन नुकतीच सुरू झाली होती. ती पकडण्याच्या नादात त्यांचा पाय घसरला आणि त्या प्लॅटफॉम व ट्रेनच्या मधील मोकळ्या जागेत अडकल्या. यात त्यांना गंभीर दुखापत झाली.

पोलिसांनी तातडीनं त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या नातेवाईकांना ही माहिती दिली. त्यानंतर प्रगती घरत यांना अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बोरिवली रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. ही घटना 10 जानेवारीला घडली होती. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT