Sion Bridge Accident  Saam tv
मुंबई/पुणे

Sion Bridge Accident : मुंबईच्या सायन ब्रिजवर भीषण अपघात, ४ वाहने एकमेकांना धडकल्या

Vishal Gangurde

Mumbai Sion Bridge Accident :

राज्यात अपघाताचे सत्र सुरुच असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईतही सायन ब्रिजवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबईच्या सायन ब्रिजवर ४ वाहने एकमेकांना धडकल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

सायन ब्रिजवर अपघाताची भीषण घटना

मुंबईतील काही दिवसांपूर्वी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत अपघाताची घटना घडली. मुंबईतील सायन ब्रिजवर अपघाताची घटना घडली. मुंबईतील सायन ब्रिजवर एका मागोमाग चार वाहने एकमेकांना धडकल्याचा घटना घडल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मार्गिकेवर वाहनांच्या रांगा

अपघात झाल्यानंतर सायन ब्रिजवर मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सायन ब्रिजवर झालेल्या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. या अपघातात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

राज्यातील समृद्धी मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघाताची घटना घडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अपघातात कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने दुसऱ्या वाहनाला धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात राहुल निकम, शिवाजी वामनराव थोरात, अण्णा मालोदे अशी मृतांची नावे आहेत. मृत व्यक्ती संभाजीनगर येथे राहणारे असल्याची माहिती कळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT