Mumbai Local Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मुंबईत कोसळधार! विद्याविहार-कुर्ला आणि मस्जिद बंदरदरम्यान रेल्वेरूळ पाण्याखाली, लोकलसेवा कोलमडली| VIDEO

Mumbai Local Disrupt: मुंबईमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावासामुळे मुंबईची लोकलसेवा कोलमडली आहे. कुर्ला, विद्याविहार आणि मस्जिद बंदर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रूळावर पाणी साचले आहे. त्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली.

Priya More

मुंबईत पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकलसेवेवर मोठा परिणाम झालाय. रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे कुर्ला ते विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेचा खोळंबा झालाय. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर सर्व लोकल हळूहळू पुढे सरकत आहेत तर अनेक लोकल एकापाठोपाठ रुळावर थांबल्या आहेत.

लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. हे प्रवासी लोकलमधून उतरून रूळावरून चालत जात आहेत. तर ठाणे रेल्वे स्थानकावरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल अनिश्चित काळाकरता स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.

मुंबई उपनगरासह ठाण्यात पूर्णतः काळोख झाला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे मुंबईकरांची चांगलच तारांबळ उडाली. पाऊस इतका जोरात पडत आहे की त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेय. अनेक रेल्वे स्थानकांवर देखील रेल्वे रुळावर पाणी साचलेय. त्यामुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा कोलमडली. गेल्या अर्धा तासापासून कुर्ला, विद्याविहार, मस्जिद बंदर या रेल्वे स्थानकदारम्यान रेल्वे रुळावर प्रचंड पाणी साचले आहे.

रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्यामुळे लोकल एकाच ठिकाणी थांबून आहेत. त्यामुळे मुंबईकर लोकलमधून खाली उतरून रेल्वे रुळावरून चालत जवळचे रेल्वे स्थानक गाठत आहेत. तर हार्बर मार्गावरील लोकलसेवा देखील ठप्प झाली. वडाळा ते सीएसएमटी लोकलसेवा ठप्प झालीये. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचे देखील हाल होत आहे. तर रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झालाय. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT