मुंबईत मृत्यांचा आकडा वाढला ! 25 जणांचा बळी, आकडा वाढण्याची भिती  Twitter/ @ANI
मुंबई/पुणे

मुंबईत मृत्यांचा आकडा वाढला ! 25 जणांचा बळी, आकडा वाढण्याची भिती

चेंबूरच्या आरसीएफ भारत नगर येथे दरड कोसळून घर कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

शनिवारी रात्री मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस (Mumbai Rain update) झाला आहे . रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे संपुर्ण भागात पाणी साचले होते. रात्रभर झालेल्या पावसामुळे मुंबई दोन ठिकाणी 25 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. विक्रोळी येथे 7 जणांचा तर चेंबूरमध्ये 17 जणांचा घराचा छत कोसळून मृत्यू झाला आहे.

चेंबूरच्या आरसीएफ भारत नगर येथे दरड कोसळून घर कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. महानगर पालिकची माहिती दिली आहे. दरम्यान, विक्रोळी मधिल डोंगरळ भाग असलेल्या पंचशीलनगरमध्ये घराचे छत पडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डोंगराळ वस्तीमध्ये एका घरावर दुसरे असे तीन-चार घरे एकमेंकावर पडली आहेत. तर आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. NDRF चे पथक घटनास्थळी सकाळीच दाखल झाले असून बचावकार्य वेगात सुरु आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भांडूपमध्ये एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना केेंद्र सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तसेच जखमिंना ५० हजार रुपयांची मदत केली आहे.

मुंबईसह इतर ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वेचं वेळापञक डगमगलं आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर अनेक स्थानकांवर रेल्वे रुळ जलमय झाले आहेत. ठाणे /कल्याण, कर्जत/ खोपोली, कसारा सेक्शन, वाशी / पनवेल, ट्रान्स हार्बर लाइन, नेरूळ/बेलापूर, खारकोपर लाइन वरील गाड्या कार्यरत, तर एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापञकात बदल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. त्याचबरोबर राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊ सुरु आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत आगीच सत्र सुरूच, भांडूपमधील ड्रिम्स मॅालला आग

Jaggery Vs Sugar In Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी गूळ साखरेपेक्षा चांगला आहे का? रक्तातील साखर वाढू नये म्हणून गुळाचे सेवन किती करावे?

Political News: उपमुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, अनेक वर्षांचा सुखी संसार मोडला; पोस्ट होतेय व्हायरल

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू

Gokul President Election: 'गोकुळ'चा अध्यक्ष कोण होणार? आज होणार स्पष्ट, शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT