Potholes spotted on the Mumbai-Pune Missing Link just two months after inauguration, raising concerns over construction quality and commuter safety. saam tv
मुंबई/पुणे

दोन महिन्यात मिसिंग लिंकवर खड्डे, नागरिकांचा संताप, पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर खड्डे

Mumbai Pune Missing Link: करोड रुपये खर्च करून राज्य सरकारनं मिसिंग लिंक प्रकल्प उभारला... मात्र उद्धाटनाच्या अवघ्या 2 महिन्यातच मिसिंग लिंकवर खड्डे पडलेत...त्यामुळे मिसिंग लिंकवरील खड्ड्यांमुळे सरकारवर नागरिकांनी कसा संताप व्यक्त केलाय?...आणि यावर मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलयं... पाहयात या रिपोर्टमधून...

Saam Tv

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या कामाची गुणवत्ता पहिल्याच पावसात चव्हाट्यावर आलीय...1 मे 2026 ला मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या या मार्गावर अवघ्या दोन महिन्यांतच खड्डे दिसू लागले आहेत. ...हा व्हिडिओ पाहा... काही दिवसांपूर्वीच या मिसिंग लिंकच्या बोगदा क्रमांक दोनजवळ एका कारवर दरड कोसळल्याची घटना घडली ताजी असताना आता खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय...जागतिक दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हा मार्ग तयार केल्याचा दावा राज्य सरकारनं केला होता. मात्र, पहिल्याच पावसानंतर हा दावा फोल ठरला... त्यामुळे विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतला...

दरम्यान खड्ड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं तातडीनं हे खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं...दरम्यान 'मिसिंग लिंक'वरील खड्ड्यांवरून विरोधकांनी घेरल्यानंतर पहिल्या पावसात रस्त्याची टिकण्याची क्षमता 'टेस्टीगं ' होत अस सांगत "मिसिंग लिंकवर फक्त कनेक्टरजवळ दोन खड्डे पडलेत, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलयं...

मुख्यमंत्र्यांनी जरी मिसिंग लिंकवरील खड्डे म्हणजे पहिल्या पावसातील टेस्ट आहे असं म्हटलं असलं तरी पहिल्याच पावसात रस्ता उखडला जात असेल, तर हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ नाही का? 7180 कोटी रुपये खर्च करूनही रस्त्यांचा दर्जात सुधारणा होत नसेल तर वेगवान महाराष्ट्राची स्वप्न नेमकी पाहायची तरी कशी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Death Threat: पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; जगभरात खळबळ, तपास यंत्रणा सतर्क

जन्मदात्या बापानेच अल्पवयीन मुलींच्या शरीराचे लचके तोडले; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा; शरद पवार गटानं टाकला मोठा डाव, पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Naneghat Waterfalls: मुसळधार पावसाने खुललं नाणेघाटाचं सौंदर्य; धबधबे, धुकं अन् हिरवाई अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Heavy Rain: रायगड जिल्ह्यात मुसळधार, अंबा नदीनं ओलांडली धोका पातळी; पोलादपुरात दरड कोसळली, नागरिकांचं स्थलांतर

SCROLL FOR NEXT