Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग उद्या वाहतुकीसाठी बंद; काय आहे कारण?

Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.

Bharat Jadhav

Mumbai Pune Expressway:

जे उद्या प्रवाशी मुंबई-पुणे असा प्रवास करणार असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. उद्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बंद असणार आहे. यामुळे प्रवासाची गैरसोय होऊ नये, यासाठी वेळीच पर्यायी प्रवासाचा मार्ग जाणून घ्या. (Latest News)

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई वाहिनीवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत ४५ किमी/६०० किमी आणि ४१ /५०० किमी या ठिकाणी Gantry बसविण्यात येणार आहे. Gantry बसविताना सदर कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. फक्त कारसाठी लोणावळा एक्झीट वरून जुन्या महामार्गावरून अंडा पॉईंट - मॅजिक पॉईंट वरून खोपोली शहरातून वळविण्यात येणार आहेत.

दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा. Gantry बसविताना सदर कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक उर्से टोल नाका येथे तसेच शोल्डर लेनवर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. आजही दुपारी १२ ते २ दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन हलक्या वाहनांसाठी शिंग्रोबा घाटातील वाहतूक सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT