Mahavikas Aghadi Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Politics : महाविकास आघाडीत रस्सीखेच; शरद पवार गट लोकसभेच्या 11 ते 12 जागा लढण्यावर ठाम

Mumbai Loksabha Election 2024 : सध्या मुंबईतील तीन जागांवरून जागावाटपामध्ये चढाओढ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून ईशान्य मुंबईची जागा लढवण्यास इच्छुक आहे.

प्रविण वाकचौरे

सूरज मसूरकर | मुंबई

Mumbai Political News :

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटात बैठकांचा सिलसिला सुरु आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट लोकसभेच्या 11 ते 12 जागा लढण्यावर ठाम आहे.

सध्या मुंबईतील तीन जागांवरून जागावाटपामध्ये चढाओढ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून ईशान्य मुंबईची जागा लढवण्यास इच्छुक आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे मनोज कोटक खासदार आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ईशान्य मुंबईची जागा पदरात पाडून घेण्यासाठी शरद पवार गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या ठाकरे गटाचे संजय दिना पाटील ही जागा लढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासोबत ठाकरे गटाकडून उत्तर मुंबईचा जागेच्या बदल्यात दक्षिण मध्य मुंबईची जागा आणि उत्तर पश्चिम मुंबईची जागा मिळवण्याचे प्रयत्न सूरू आहेत.

उत्तर मुंबई जागेवर सध्या भाजपचे गोपाल शेट्टी खासदार आहेत. तर दक्षिण मध्य मुंबई जागेवर शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि उत्तर पश्चिम मुंबई जागेवर गजानन किर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत. यो दोन्ही जागा लढवण्यासाठी ठाकरे गट इच्छुक आहे.

ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई जागेवर अमोल किर्तीकर तर दक्षिण मध्य मुंबईची जागा लढण्यासाठी अनिल देसाई यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. तर काँग्रेसचे संजय निरुपम उत्तर पश्चिमची जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT