Eight Shinde camp workers booked in Mumbai after protest over hospital redevelopment; tension rises ahead of local elections. saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Politics: मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी शिंदे गटाला धक्का; ८ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

FIR Filed Against 8 Shinde Camp Workers: मुंबई पोलिसांनी विक्रोळीतील एकनाथ शिंदे छावणीच्या आठ कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलाय. क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पावरून ही कारवाई करण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • शिंदे गटाच्या आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • रुग्णालय पुनर्विकासाच्या श्रेयवादातून आंदोलनाची ठिणगी पडली.

  • कार्यकर्त्यांनी आमदार सुनील राऊत यांचा पुतळा जाळल्याने वातावरण तापले.

मयूर राणे, साम प्रतिनिधी

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर राजकारणात मोठी उलाथापालथ होतेय. नेत्यांच्या पक्षात्तरांमुळे स्थानिक राजकारण तापलंय. त्याचवेळी मुंबईतून शिंदे गटाची चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. विक्रोळीत शिंदे पक्षाच्या आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विक्रोळी पूर्व येथील असलेल्या पालिकेच्या क्रांतिवीर महात्मा जोतिबा रुग्णालय पुनर्विकासाचे काम सुरू आहे. मात्र आता यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झालीय.

काही दिवसांपूर्वी आमदार सुनील राऊत यांनी रुग्णालयाच्या कामाची पाहणी करून सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. याविरोधात शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळीत आंदोलन केले होते. आमदार सुनील राऊत यांचा पुतळा जाळला होता. ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळी पोलीस ठाणे समोर जाहीर निषेध करत आंदोलन केले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुनील राऊत यांचा पुतळा जाळला होता.

याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली होती. त्यांनी विक्रोळी पोलिसांनी त्याप्रकरणी तक्रार दाखल केली, त्यानंतर शिवसेना शिंदे पक्षाच्या आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला गेलाय.

शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे

गुरुज्योत सिंग, आदित्य सावंत, गणेश रोकडे, विक्रम कुबल, राजेश्री रेडकर, सतीश दोडके, समीक्षा मोरे, नीरज मोर

दरम्यान ३२ हजार ८२५ चौरस मीटर क्षेत्रफळावर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात आलाय. रुग्णालय व स्टाफ क्वॉर्टर्स परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विस्तारले गेलेत. तसेच स्टाफ क्वॉर्टर्स इमारतीत सभागृह, उपाहारगृह, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, ओपीडी अशा सोयीसुविधा असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT