Social Media Saam tv
मुंबई/पुणे

प्रक्षोभक, आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना बसणार चाप, मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब सक्रिय

या प्रकरणी आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ६१ जणांना अटक केली आहे.

सुरज सावंत

मुंबई - देभभरात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. याप्रकरणी मुंबईतही गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) विशेष शाखेने अवघ्या चार महिन्यात 12 हजार 800 प्रक्षोभक, आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या आहेत. पोस्ट सोशल मिडियावरून (Social Media) हटवल्या आहेत. विशेष शाखेने यावर्षी जानेवारीत 5 हजार 754, फेब्रुवारीमध्ये 4 हजार 252, मार्चमध्ये तीन हजार 958 वादग्रस्त पोस्ट हटवल्या आहेत. रामनवमीपासून देभभरात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या.

हे देखील पहा -

याप्रकरणी मुंबईत मानखुर्द, मालवणी, कुरार, आरे पोलीस ठाण्यात चार गुन्हे देखील दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून मानखुर्द घटनेत आतापर्यंत 30 जणांना अटक केली आहे. कुरार प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे. गोरेगाव प्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आली आहे . तर आतापर्यंत मुंबई पोलिसांनी 61 जणांना अटक केली आहे.

या धार्मिक हिसांचारांना अनेकदा सोशल मिडियावरील व्हायरल पोस्टममुळे वेगळे वळण मिळते. त्यामुळे विशेष शाखा व सायबर पोलीस अशा सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर नजर ठेवून राहतात आणि त्यामुळेच मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने चार महिन्यात 12 हजार 800 वादग्रस्त पोस्ट सोशल मिडियावरून हटवल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badam Benefits: रोज सकाळी ५ बदाम खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

आधी १४ महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् मग स्वत: आयुष्याचा दोर कापला, सोलापुरातील धक्कादायक घटना

Bhakri Tips: तांदळाची मऊ, लुसलुशीत भाकरी कशी बनवायची? सोपी आहे पद्धत

New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान

SCROLL FOR NEXT